दिवाळी : अशी काढा पाच बोटांची रांगोळी
Published
दिवाळी आली की दिवे आणि आकाशकंदीलसोबतच लगबग सुरू होते ती रंगीबेरंगी रांगोळी काढण्याची. महिलांप्रमाणेच अनेक पुरूष मंडळीसुध्दा आता रांगोळ्या काढताना दिसतात.
डोंबिवलीचा उमेश पांचाळ गेल्या १७-१८ वर्षांपासून संस्कारभारती रांगोळी काढतो. पाचही बोटं एकत्र करून जी रांगोळी काढतात तिला संस्कार भारती रांगोळी म्हणतात आणि पोट्रेट रांगोळी म्हणजे जे व्यक्ती चित्रण असतं, म्हणजे एखाद्या व्यक्तीचा फोटो ते आपण त्या रांगोळीमध्ये साकारतो.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)