टीम इंडिया विजयी पाऊल टाकणार?

फोटो स्रोत, Getty Images
ऑस्ट्रेलियात कसोटी विजय साकारण्याच्या दृष्टीने भारतीय क्रिकेट संघाने दमदार पाऊल टाकले आहे. चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या 4 बाद 104 धावा झाल्या आहेत. पाचव्या आणि अंतिम दिवशी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 219 धावांची आवश्यकता आहे तर भारतीय संघाला 6 विकेट्सची आवश्यकता आहे.
शॉन मार्श 31 तर ट्रॅव्हिस हेड 11 धावांवर खेळत आहेत. भारतीय संघातर्फे रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स पटकावल्या.
भारतीय संघाने दुसऱ्या डावात 307 धावांची मजल मारली. पहिल्या डावातील शतकवीर पुजाराने दुसऱ्या डावात 71 धावांची सुरेख खेळी साकारली. अजिंक्य रहाणेने 70 धावांची खेळी केली. पुजारा-रहाणे जोडीने चौथ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियातर्फे नॅथन लियॉनने 6 विकेट्स घेतल्या.

फोटो स्रोत, Getty Images
भारतीय संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करताना 250 धावा केल्या. चेतेश्वर पुजाराने 7 चौकार आणि 2 षटकारांसह 123 धावांची खेळी साकारली. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 235 धावांतच आटोपला. ट्रॅव्हिस हेडने 72 धावा केल्या. भारतातर्फे जसप्रीत बुमराह आणि रवीचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी 3 विकेट्स मिळवल्या.
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात आतापर्यंत केवळ 5 कसोटी सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियातला शेवटचा विजय भारतीय संघाने दहा वर्षांपूर्वी म्हणजेच 2008मध्ये साजरा केला होता.
भारतीय संघाने आतापर्यंत ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकलेली नाही.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

















