कॅनडात गोळीबारात चार जणांचा मृत्यू

कॅनडा, गोळीबार
फोटो कॅप्शन, कॅनडात गोळीबार
Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

कॅनडातील फ्रेडइरिक्शन या शहरात अंदाधुंद गोळीबारात चारजणांचा मृत्यू झाला आहे. न्यू ब्रून्सविक प्रांताची फ्रेडइरिक्शन ही राजधानी आहे. मृतांमध्ये दोन पोलिसांचा समावेश आहे.

सुरक्षेचा उपाय म्हणून ब्रुकसाइड ड्राइव्हच्या रहिवाशांना घरातच राहण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. घराची कडीकुलूपं लावून घेण्याचंही सांगण्यात आलं आहे. गोळीबार अजूनही सुरू असल्याचं स्थानिक प्रशासनानं सांगितलं.

जसजशी माहिती मिळेल तसं आम्ही लवकरच तपशील जाहीर करू असं फ्रेडइरिक्शन शहराच्या पोलिसांनी सांगितलं.

कॅनडा, गोळीबार
फोटो कॅप्शन, कॅनडा नकाशा

चारवेळा गोळीबाराचा आवाज ऐकल्याचं एका स्थानिक पत्रकारानं सांगितलं.

सीटीव्ही अटलांटिकचे पत्रकार निक मूर यांनी घटनास्थळाचा व्हीडिओ ट्विटरवर अपलोड केला आहे. आपत्कालीन पथकाची वाहनं घटनास्थळी दाखल झाली असल्याचं व्हीडिओत दिसत आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)